दुःख हा शब्द जरी आनंद या शब्दापेक्षा लहान असला तरी आपल्याला आनंद झाल्यावर जितके चांगले क्षण भेटतात तितकेच वाईट क्षण दुःख झाल्यावर आपल्याला भेटतात . दुःख आणि आनंद हे शब्द प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येत असतात आणि
त्यांच्यासोबत आपल्याला नेहमी सवय करून घ्यावी लागते कधी दुःख येते तर कधी आनंद या दोन गोष्टी कधीच आपला साथ सोडत नाही .
आपल्याला आनंद व दुःखाच्या पायऱ्या नेहमी जीवनात चढाव्या लागतात ते म्हणतात ना फक्त आनंद भेटला तर जीवन जाण्यात संघर्ष राहत नाही दुःखाचे क्षण आल्यावर आपण लढतो , झगडतो व त्यावर मात देतो त्या क्षणातून आपल्याला स्वतःला सवरायची व समजूतदापणाची शिकवण भेटते. दुःख हे देखील कायमचे नसते दुःखाच्या काही पायऱ्या चढल्यावर आयुष्यात आनंदाच्या देखील पायऱ्या आपली वाट बघत असतात. आपले जीवन हे आपल्याला खूप काही शिकवून जाते योग्य अयोग्य गोष्टींची जाण करून देते आपली मानसिक भावनांची वाढ योग्यता यातूनच होते परिस्थितीची जाणीव देखील आपल्याला या गोष्टीतून होते फक्त स्वतःचे मनोबल भावना योग्य विचारसरणीच्या हव्या आजच्या या गडबडीच्या जगात माणूस हा आपले दुःख हे चेहऱ्याच्या आड लपवून चेहऱ्यावर एक हास्य रुजवत असतात जीवनात दुःखाच्या व आनंदाच्या पायऱ्या अशा चढा की असे समजा ते तर काही काळासाठीचं आहे . काही ना काही दिवसांनी हे दिवस पण जातील असा विचार करून दुःखाची व आनंदाची पायरी चढा....
- Gauri Gaikwad ✍ .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा